Tukaram Abhangs (Gatha)
तुकाराम गाथा
मूल श्लोकः
टंवकारूनि दृष्टी लावुनियां रंग । दावी झगमग डोऑयांपुढें ॥1॥ ह्मणती शिष्यासी लागली समाधी । लटकी चि उपाधी झकविती ॥ध्रु.॥ दीपाचिया ज्योती कोंडियेलें तेज । उपदेश सांजरात्रीमाजी ॥2॥ रांगोिळया चौक शृंगारुनी वोजा । आवरण पूजा यंत्र करी ॥3॥ पडदा लावोनियां दीप चहूं कोनीं । बैसोनि आसनीं मुद्रा दावी ॥4॥ नैवेद्यासी ह्मणे करावें पक्वान्न । पात्रासी दिव्यान्न परवडी ॥5॥ जाला उपदेश कवळ घ्या रे मुखीं । आपोशन शेखीं बुडविलें ॥6॥ पाषांड करोनि मांडिली जीविका । बुडवी भाविकां लोकांप्रती ॥7॥ कायावाचामनें सोडवी संकल्प । गुरु गुरु जप प्रतिपादी ॥8॥ शुद्ध परमार्थ बुडविला तेणें । गुरुत्वभूषणें भोग भोगी ॥9॥ विधीचा ही लोप बुडविला वेद । शास्त्रांचा ही बोध हरविला ॥10॥ योगाची धारणा नाहीं प्राणायाम । सांडी यम नेम नित्यादिक ॥11॥ वैराग्याचा लोप हरिभजनीं विक्षेप । वाढविलें पाप मतिलंडें ॥12॥ तुका ह्मणे गेलें गुरुत्व गुखाडी । पूर्वजांसी धाडी नर्कवासा ॥13॥
Tuka 784
Audio
Translations & commentaries(0)
No translations available for this verse yet.