Tukaram Abhangs (Gatha)
तुकाराम गाथा
मूल श्लोकः
विठ्ठला रे तूं उदाराचा राव । विठ्ठला तूं जीव या जगाचा ॥1॥ विठ्ठला रे तूं उदाराची रासी । विठ्ठला तुजपाशीं सकळसिद्धी ॥ध्रु.॥ विठ्ठला रे तुझें नाम बहु गोड । विठ्ठला रे कोड पुरविसी ॥2॥ विठ्ठला रे तुझें श्रीमुख चांगलें । विठ्ठला लागलें ध्यान मनीं ॥3॥ विठ्ठला रे वाचे बोला बहुरस । विठ्ठला रे सास घेतला जीवें ॥4॥ विठ्ठला रे शोक करीतसे तुका । विठ्ठला तूं ये कां झडकरी ॥5॥
Tuka 676
Audio
Translations & commentaries(0)
No translations available for this verse yet.