Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

ताप हें हरण श्रीमुख । हरी भवरोगा ऐसें दुःख । अवलोकितां उपजे सुख । उभें सन्मुख दृष्टीपुढें ॥1॥ न पुरे डोिळयांची धणी । सखोल कृपेची च खाणी । स्तवितां न पुरे वेदवाणी । तो हा समचरणी कृपानिधी ॥ध्रु.॥ रामकृष्णध्यान वामननारसिंहीं । उग्र आणि सौम्य कांहीं च नाहीं । सांपडे भरलीये वाही । भाव शुद्ध पाहीं याचें भातुकें ॥2॥ गुणगंभीर चतुर सुजाण। शूर धीर उदार नारायण। व्यापक तरी त्रिभुवन । मनमोहनलावण्य हें ॥3॥ ठाण हें साजिरें सुंदर । अविनाश अविकार । अनंत आणि अपार । तो हा कटीं कर धरिताहे ॥4॥ जयाची वाणी सुमनमाळा। परमामृतजिव्हाळा । अनंता अंगीं अनंत कळा । तुका जवळा चरण सेवे ॥5॥ कान्होबा0नाट अभंग 7

Tuka 664

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.