Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

हें चि भवरोगाचें औषध । जन्म जरा तुटे व्याध । आणीक कांहीं नव्हे बाध । करील वध षड्वर्गा ॥1॥ सांवळें रूप ल्यावें डोळां । सा चौ अठरांचा गोळा । पदर लागों नेदी खळा । नाममंत्रमाळा विष्णुसहस्र ॥ध्रु.॥ भोजना न द्यावें अन्न । जेणें चुके अनुपान । तरीं च घेतल्याचा गुण । होइऩल जाण सत्य भाव ॥2॥ नये निघों आपुलिया घरा । बाहेर लागों नये वारा । बहु बोलणें तें सारा । संग दुसरा वर्जावा ॥3॥ पास तें एक द्यावें वरी । नवनीताची होइऩल परी । होइऩल गुसिळलें तें निवारी । सार भीतरी नाहीं तया ॥4॥ न्हायें अनुतापीं पांघरें दिशा । स्वेद निघों दे अवघी आशा । होसिल मागें होतासि तैसा । तुका ह्मणे दशा भोगीं वैराग्य ॥5॥

Tuka 650

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.