Tukaram Abhangs (Gatha)
तुकाराम गाथा
मूल श्लोकः
हातींचें न संडावें देवें । शरण आलों जीवें भावें । आपुलें ऐसें ह्मणावें । करितों जीवें निंबलोण ॥1॥ बैसतां संतांचे पंगती । कळों आलें कमळापती । आपुलीं कोणी च नव्हती । निश्चय चित्तीं दृढ जाला ॥ध्रु.॥ येती तुझिया भजना आड । दाविती प्रपंचाचें कोड । कनिष्ठीं रुचि ठेऊनि गोड । देखत नाड कळतसे ॥2॥ मरती मेलीं नेणों किती । तो चि लाभ तयाचे संगती । ह्मणोनि येतों काकुलती । धीर तो चित्तीं दृढ द्यावा ॥3॥ सुखें निंदोत हे जन । न करीं तयांशीं वचन । आदिपिता तूं नारायण । जोडी चरण तुमचे तें ॥4॥ आपलें आपण न करूं हित । करूं हें प्रमाण संचित । तरी मी नष्ट चि पतित । तुका ह्मणे मज संत हांसती ॥5॥
Tuka 643
Audio
Translations & commentaries(0)
No translations available for this verse yet.