Tukaram Abhangs (Gatha)
तुकाराम गाथा
मूल श्लोकः
आतां माझा नेणों परतों भाव । विसावोनि पायीं ठेविला जीव । सकळां लाभांचा हा ठाव । ऐसा वाव जाला चित्ताठायीं ॥1॥ भांडवल गांठी तरि विश्वास । जालों तों जालों निश्चय दास । न पाहें मागील ते वास । पुढती सोस सेवेचा ची ॥ध्रु.॥ आहे तें निवेदिलें सर्व । मी हें माझें मोडियला गर्व । अकाळीं काळ अवघें पर्व । जाला भरवसा कृपेलाभाचा ॥2॥ वेव्हारीं वेव्हारा अनंत । नाहीं यावांचुनी जाणत । तरी हें समाधान चित्त । लाभहानी नाहीं येत अंतरा ॥3॥ करूनि नातळों संसारा । अंग भिन्न राखिला पसारा । कळवळा तो जीवनीं खरा । बीजाचा थारा दुरी आघात ॥4॥ बहु मतापासूनि निराळा । होऊनि राहिलों सोंवळा । बैसल्या रूपाचा कळवळा । तुका ह्मणे डोळां लेइलों तें ॥5॥
Tuka 641
Audio
Translations & commentaries(0)
No translations available for this verse yet.