Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

मज ते हांसतील संत । जींहीं देखिलेती मूतिऩमंत । ह्मणोनि उद्वेगलें चित्त । आहा च भH ऐसा दिसें ॥1॥ ध्यानीं म्या वर्णावेति कैसे । पुढें एकीं स्तुति केली असे । तेथूनि जीव निघत नसे । ऐसिये आश लागलोंसें ॥ध्रु.॥ कासया पाडिला जी धडा । उगा चि वेडा आणि वांकडा । आह्मां लेंकरांसि पीडा । एक मागें जोडा दुस†याचा ॥2॥ सांगा कोणाचा अन्याय । ऐसें मी धरीतसें पाय । तूं तंव सम चि सकळां माय । काय अन्याय एक माझा ॥3॥ नये हा जरी कारणा । तरी कां व्यालेति नारायणा । वचन द्यावें जी वचना । मज अYााना समजावीं ॥4॥ बहुत दिवस केला बोभाट । पाहातां श्रमलों ते वाट । तुका ह्मणे विस्तारलें ताट । काय वीट आला नेणों स्वामी ॥5॥

Tuka 639

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.