Tukaram Abhangs (Gatha)
तुकाराम गाथा
मूल श्लोकः
कां हो माझा मानियेला भार । ऐसा दिसे फार । अनंत पावविलीं उद्धार । नव्हे चि थार मज शेवटीं ॥1॥ पाप बिळवंत गाढें । तुज ही राहों सकतें पुढें । मागील कांहीं राहिलें ओढें । नवल कोडें देखियेलें ॥2॥ काय मानिती संतजन । तुमचें हीनत्ववचन। कीं वृद्ध जाला नारायण । न चले पण आधील तो ॥3॥ आतां न करावी चोरी । बहुत न धरावें दुरी । पडदा काय घरच्याघरीं । धरिलें दुरी तेव्हां धरिलें ॥4॥ नको चाळवूं अनंता । कासया होतोसि नेणता । काय तूं नाहीं धरीत सत्ता । तुका ह्मणे आतां होइप प्रगट ॥5॥
Tuka 638
Audio
Translations & commentaries(0)
No translations available for this verse yet.