Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

आतां मी न पडें सायासीं । संसारदुःखाचिये पाशीं । शरण रिघेन संतांसी । ठाव पायांपाशीं मागेन त्यां ॥1॥ न कळे संचित होतें काय । कोण्या पुण्यें तुझे लाधती पाय । आतां मज न विसंबें माय । मोकलूनि धाय विनवीतसें ॥2॥ बहुत जाचलों संसारें । मोहमायाजाळाच्या विखारें । त्रिगुण येतील लहरें । तेणें दुःखें थोरें आक्रंदलों ॥3॥ आणीक दुःखें सांगों मी किती । सकळ संसारिस्थती । न साहे पाषाण फुटती । भय चित्तीं कांप भरलासे ॥4॥ आतां मज न साहवे सर्वथा । संसारगंधीची हे वार्ता । जालों वेडा असोनि जाणता । पावें अनंता तुका ह्मणे ॥5॥

Tuka 625

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.