Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

आले हो संसारा तुह्मी एक करा । मुक्तीमारग हळू चि धरा । काळदंड कुंभयातना थोरा । कां रे अघोरा देखसी ना ॥1॥ नाहीं त्या यमासि करुणा । बाहेर काढितां कुडी प्राणा । ओढाळ सांपडे जैं धान्या । चोर यातना धरिजेतां ॥2॥ नाहीं दिलें पावइल कैसा । चालतां पंथ तेणें वळसा । नसेल ठाउकें ऐकतो कैसा । नेती बंद जैसा धरोनियां ॥3॥ क्षण एक नागीवा पायीं । न चलवे तया करितां कांहीं । वोढितां कांटवणा सोइप । अिग्नस्तंभीं बाही कवटाळविती ॥4॥ देखोनि अंगें कांपती । तये नदीमाजी चालविती। लागे ठाव न लगे बुडविती । वरि मारिती यमदंड ॥5॥ तानभूक न साहावे वेळ । तो राखिती कितीएक काळ । पिंड पाळूनि कैसा सीतळ । तो तप्तभूमीं ज्वाळ लोळविती ॥6॥ ह्मणउनी करा कांहीं सायास । व्हावेल तर व्हा रे उदास । करवेल तर करा नामघोष । सेवा भक्तीरस तुका ह्मणे ॥7॥

Tuka 623

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.