Tukaram Abhangs (Gatha)
तुकाराम गाथा
मूल श्लोकः
जेणें हा जीव दिला दान । तयाचें करीन चिंतन । जगजीवन नारायण । गाइऩन गुण तयाचे ॥1॥ जो या उभा भीवरेच्या तिरीं । कट धरूनियां करीं । पाउलें सम चि साजिरीं । अंतरीं धरोनि राहेन ॥ध्रु.॥ जो या असुरांचा काळ । भक्तजनप्रतिपाळ । खेळे हीं लाघवें सकळ । तयाच्या भाळ पायांवरी ॥2॥ जो या गोपाळांच्या मेळीं । खेळु खेळे वनमाळी । रसातळा नेला बळी । राहे पाताळीं स्वामी माझा ॥3॥ जो हा लावण्यपुतळा । जयाचे अंगीं सकळ कळा । जयाचे गळां वैजयंतीमाळा । तया वेळोवेळां दंडवत ॥4॥ जयाचे नाम पाप नासी । लIमी ऐसी जयाची दासी । जो हा तेजोपुंज्यरासी । सर्वभावें त्यासि तुका शरण ॥5॥
Tuka 618
Audio
Translations & commentaries(0)
No translations available for this verse yet.