Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

आतां पावन सकळ सुखें । खादलें कदा तें नखें । अवघे सरलें पारिखें । सकळ देखें माहियरें ॥1॥ जवळी विठ्ठल रखुमाइऩ । बहिणी बंधु बाप आइऩ । सकळ गोताची च साइऩ । पारिखें काइप ऐसें नेणिजे ॥ध्रु.॥ जगदाकारीं जाली सत्ता । वारोनी गेली पराधीनता । अवघे आपुलें चि आतां । लाज आणि चिंता दु†हावली ॥2॥ वावरे इच्छा वसे घरीं । आपुले सत्तेचे माहेरीं । करवी तैसें आपण करी । भीड न घरी चुकल्याची ॥3॥ सोसिला होता सासुरवास। बहुतांचा बहुत दिवस । बहु कामें पुरविला सोस । आतां उदास आपुल्यातें ॥4॥ करिती कवतुक लाडें । मज बोलविती कोडें । मायबाप उत्तरें गोडें । बोेले बोबडें पुढें तुका ॥5॥

Tuka 614

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.