Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

बरवा झाला वेवसाव । पावलों चिंतिला चि ठाव । दृढ पायीं राहिला भाव । पावला जीव विश्रांती ॥1॥ बरवा फळला शकुन । अवघा निवारिला सिण । तुमचें जालिया दरुषण । जन्ममरण नाहीं आता ॥ध्रु.॥ बरवें जालें आलों या ठाया । होतें संचित ठायींच पाया । देहभाव पालटली काया । पडली छाया ब्रह्मींची ॥2॥ जोडिलें न सरे हें धन । अविनाश आनंदघन । अमूर्तमूतिऩ मधुसूदन। सम चरण देखियेले ॥3॥ जुनाट जुगादिचें नाणें । बहुता काळाचें ठेवणें । लोपलें होतें पारिखेपणें । ठावचळण चुकविला ॥4॥ आतां या जीवाचियासाठीं । न सुटे पडलिया मिठी। तुका ह्मणे सिणलों जगजेठी । न लगो दिठी दुस†याची ॥5॥

Tuka 612

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.