Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

प्रथमारंभीं लंबोदर । सकळ सिद्धींचा दातार । चतुर्भुज फरशधर । न कळे पार वणिऩतां ॥1॥ तो देव नटला गौरीबाळ । पायीं बांधोनि घाग†या घोळ । नारदतुंबरसहित मेळ । सुटला पळ विघ्नांसी ॥2॥ नटारंभी थाटियला रंग । भुजा नाचवी हालवी अंग। सेंदुरविलेपनें चांग । मुगुटीं नाग मिरविला ॥3॥ जया मानवतीदेव ॠषि मुनी । पाहातां न पुरें डोिळयां धनी । असुर जयाच्या चरणीं। आदीं अवसानीं तो चि एक ॥4॥ सकळां सिद्धींचा दातार । जयाच्या रूपा नाहीं पार । तुका ह्मणे आमुचा दातार । भवसागर तारील हा ॥5॥

Tuka 610

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.