Tukaram Abhangs (Gatha)
तुकाराम गाथा
मूल श्लोकः
येथील हा ठसा । गेला पडोनियां ऐसा ॥१॥ घरीं देवाचे अबोला । त्याची ते चि सवे त्याला ॥ध्रु॥. नाहीं पाहावें लागत । एकाएकीं च ते रित ॥२॥ तुका म्हणे जन । तयामध्यें येवढें भिन्न ॥३॥ ५९४. करितां देवार्चन । घरा आले संतजन ॥१॥ देव सारावे परते । संत पूजावे आरते ॥ध्रु.॥. शाळिग्राम विष्णुमूर्ती । संत हो का भलते याती ॥२॥ तुका म्हणे संधी । अधिक वैष्णवांची मांदी ॥३॥ ५९५. ज्याची खरी सेवा । त्याच्या भय काय जीवा ॥१॥ करितां स्वामीसवें वाद । अधिक अधिक आनंद ॥ध्रु.॥. असावा तो धर्म । मग साहों जातें वर्म ॥२॥ वदे वाग्देवी । तुका विठ्ठली गौरवी ॥३॥ ५९६. देवें जीव धाला । संसार तो कडू झाला ॥१॥ ते चि येतील ढेंकर । आनंदाचे हरिहर ॥ध्रु.॥. वेधी आणिकांस । ऐसा जया अंगीं कस ॥२॥ तुका म्हणे भुक । येणें न लगे आणीक ॥३॥ ५९७. नाम साराचें ही सार । शरणागत यमकिंकर ॥१॥ उतमातम । वाचे बोला पुरुषोत्तम ॥ध्रु.॥. नाम जपतां चंद्रमौळी । नामें तरला वाल्हा कोळी ॥२॥ तुका म्हणे वणूप काय । तारक विठोबाचे पाय ॥३॥ ५९८. गातों भाव नाहीं अंगीं । भूषण करावया जगीं ॥१॥ परि तूं पतितपावन । करीं साच हें वचन ॥ध्रु.॥. मुखें म्हणवितों दास । चित्तीं माया लोभ आस ॥५॥ तुका म्हणे दावीं वेश । तैसा अंतरीं नाहीं लेश ॥३॥ ५९९. द्रव्य असतां धर्म न करी । नागविला राजद्वारीं ॥१॥ माय त्यासि व्याली जेव्हां । रांड सटवी नव्हती तेव्हां ॥ध्रु.॥. कथाकाळीं निद्रा लागे । कामीं श्वानापरी जागे ॥२॥ भोग स्त्रियेसि देतां लाजे । वस्त्र दासीचें घेउनि निजे ॥३॥ तुका म्हणे जाण । नर गाढवाहुनी हीन ॥४॥ ६००. मुखें बोले ब्रम्हज्ञान । मनीं धनअभिमान ॥१॥ ऐशियाची करी सेवा । काय सुख होय जीवा ॥ध्रु.॥. पोटासाठीं संत । झाले कलींत बहुत ॥२॥ विरळा ऐसा कोणी । तुका त्यासि लोटांगणी ॥३॥ वर्ग:गाथा वर्ग:संत तुकाराम साहित्य वर्ग:तपासणी करायचे साहित्य
Tuka 593
Audio
Translations & commentaries(0)
No translations available for this verse yet.