Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

काकुलती एकें पाहाती बाहेरी । तया ह्मणे हरि वोसरला ॥1॥ वोसरला मेघ आला होता काळ । बाहेरी सकळ आले लोक ॥2॥ कवतुक जालें ते काळीं आनंद । कळला गोविंद साच भावें ॥3॥ भावें तयापुढें नाचती सकळें । गातील मंगळें ओंव्या गीत ॥4॥ गीत गाती ओंव्या रामकृष्णावरी । गोपाळ मोहोरी वाती पांवे ॥5॥ वत्सें गाइऩ पशू नाचती आनंदें । वेधलिया छंदें गोविंदाच्या ॥6॥ चित्त वेधियेलें गोविंदें जयाचें । कोण तें दैवाचें तयाहुनि ॥7॥ तयाहुनि कोणी नाहीं भाग्यवंत । अखंड सांगात गोविंदाचा ॥8॥ गोविंदाचा संग तुका ह्मणे ध्यान । गोविंद ते जन गोकुळींचे ॥9॥

Tuka 4554

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.