Tukaram Abhangs (Gatha)
तुकाराम गाथा
मूल श्लोकः
सांडवले सकळांचे अभिमान । आणिले शरण लोटांगणीं॥1॥ लोटांगणीं आले होऊनियां दीन । मग नारायण ह्मणे भलें ॥2॥ भला आजि तुह्मी केला साच पण । गिरि गोवर्धन उचलिला ॥3॥ लागती चरणा सकळ ते काळीं । आह्मांमध्यें बळी तूं चि एक ॥4॥ एका तुजविण न यों आह्मी कामा । कळों कृष्णा रामा आलें आजी ॥5॥ आजिवरि आह्मां होता अभिमान । नेणतां चरणमहिमा तुझा ॥6॥ तुझा पार आह्मी नेणों नारायणा । नखीं गोवद्धऩना राखियेलें ॥7॥ राखियेलें गोकुळ आह्मां सकळांसि । दगडाच्या राशी वरुषतां ॥8॥ वर्णावें तें काय तुझें महिमान । धरिती चरण सकिळक ॥9॥ सकळ ही तान विसरलीं भूक । सकळ ही सुख दिलें त्यांसि ॥10॥ त्यासि कळों आला वैकुंठनायका। तुका ह्मणे लोक निर्भर ते ॥11॥
Tuka 4547
Audio
Translations & commentaries(0)
No translations available for this verse yet.