Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

नेणें वर्ण धर्म जीं आलीं सामोरीं । अवघीं च हरी आिंळगिलीं ॥1॥ हरि लोकपाळ आले नगरांत । सकळांसहित मायबाप ॥2॥ पारणें तयांचें जालें एका वेळे । देखिलें सावळें परब्रह्म ॥3॥ ब्रह्मानंदें लोक सकळ नाचती । गुढिया उभविती घरोघरीं ॥4॥ घरोघरीं सुख आनंद सोहळा । सडे रंग माळा चौकदारीं ॥5॥ दारीं वृंदावनें तुळसीचीं वनें । रामकृष्णगाणें नारायण॥6॥ नारायण तिहीं पूजिला बहुतीं । नाना पुष्पयाती करूनियां ॥7॥ यांचें ॠण नाहीं फिटलें मागील । पुढें भांडवल जोडिती हीं ॥8॥ हीं नव्हतीं कधीं या देवा वेगळीं । केला वनमाळी सेवाॠणी ॥9॥ सेवाॠणें तुका ह्मणे रूपधारी । भHांचा कैवारी नारायणा ॥10॥

Tuka 4532

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.