Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

नेदी कळों केल्याविण तें कारण । दाखवी आणून अनुभवा ॥1॥ न पुरेसा हात घाली चेंडूकडे । ह्मणीतलें गडे सांभाळावें ॥2॥ सांभाळ करितां सकळां जिवांचा । गोपाळांसि वाचा ह्मणे बरें ॥3॥ बरें विचारुनी करावें कारण । ह्मणे नारायण ब†या बरें ॥4॥ बरें ह्मणउनि तयांकडे पाहे । सोडविला जाय चेंडू तळा ॥5॥ तयासवें उडी घातली अनंतें । गोपाळ रडते येती घरा ॥6॥ येतां त्यांचा लोकीं देखिला कोल्हाळ । सामोरीं सकळ आलीं पुढें ॥7॥ पुसतील मात आपआपल्यासि । हरिदुःखें त्यांसी न बोलवे ॥8॥ न बोलवे हरि बुडालासें मुखें । कुटितील दुःखें उर माथे ॥9॥ मायबापें तुका ह्मणे न देखती । ऐसें दुःख चित्तीं गोपाळांच्या ॥10॥

Tuka 4519

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.