Tukaram Abhangs (Gatha)
तुकाराम गाथा
मूल श्लोकः
आपुलाल्यापरी करितील सेवा । गीत गाती देवा खेळवूनि ॥1॥ खेळु मांडियेला यमुने पाबळीं । या रे चेंडुफळी खेळूं आतां ॥2॥ आणविल्या डांगा चवगुणां काठी । बैसोनिया वांटी गडिया गडी ॥3॥ गडी जंव पाहे आपणासमान । नाहीं नारायण ह्मणे दुजा ॥4॥ जाणोनि गोविंदें सकळांचा भाव । तयांसि उपाव तो चि सांगे ॥5॥ सांगे सकळांसि व्हा रे एकीकडे । चेंडू राखा गडे तुह्मी माझा ॥6॥ मज हा न लगे आणीक सांगाती । राखावी बहुतीं हाल माझी ॥7॥ माझे हाके हाक मेळवा सकळ । नव जा बरळ एकमेकां ॥8॥ एका समतुकें अवघेचि राहा । जाइऩल तो पाहा धरा चेंडू ॥9॥ चेंडू धरा ऐसें सांगतो सकळां । आपण निराळा एकला चि ॥10॥ चिंडुनियां चेंडू हाणे ऊर्ध्वमुखें । ठेलीं सकिळक पाहात चि ॥11॥ पाहात चि ठेलीं न चलतां कांहीं । येरू लवलाहीं ह्मणे धरा ॥12॥ धरावा तयानें त्याचें बळ ज्यासि। येरा आणिकांसि लाग नव्हे ॥13॥ नव्हे काम बळ बुिद्ध नाहीं त्याचें । न धरवे निंचें उंचाविण ॥14॥ विचारीं पडिले देखिले गोपाळ । या ह्मणे सकळ मजमागें ॥15॥ मार्ग देवाविण न दिसे आणिका । चतुर होत का बहुत जन ॥16॥ चतुर चिंतिती बहुत मारग । हरि जाय लाग पाहोनियां ॥17॥ या मागें जे गेले गोविंदा गोपाळ । ते नेले सीतळ पंथ ठायां ॥18॥ पंथ जे चुकले आपले मतीचे । तयांमागें त्यांचे ते चि हाल ॥19॥ हाल दोघां एक मोहरां मागिलां । चालतां चुकलां वाट पंथ ॥20॥ पंथ पुढिलांसी चालतां न कळे । मागिलांनीं डोळे उघडावे ॥21॥ वयाचा प्रबोध विचार ज्या नाहीं । समान तो देहीं बाळकांसी ॥22॥ सिकविलें हित नायिके जो कानीं । त्यामागें भल्यांनीं जाऊं नये ॥23॥ नये तें चि करी श्रेष्ठाचिया मना । मूर्ख एक जाणा तो चि खरा ॥24॥ रानभरी जाले न कळे मारग । मग तो श्रीरंग आठविला ॥25॥ लाज सांडूनियां मारितील हाका । कळलें नायका वैकुंठींच्या ॥26॥ चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणीती । तया अति प्रीति गोपाळांची॥27॥ गोपाळांचा धांवा आइकिला कानीं । सोयी चक्रपाणि पालविलें॥28॥ साया धरूनियां आले हरिपासीं । लहान थोरांसी सांभािळलें ॥29॥ सांभािळलें तुका ह्मणे सकळ हि । सुखी जाले ते ही हरिमुखें॥30॥
Tuka 4517
Audio
Translations & commentaries(0)
No translations available for this verse yet.