Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

खेळींमेळीं आले घरा गोपीनाथ । गोपाळांसहित मातेपाशीं ॥1॥ मातेपाशीं एक नवल सांगती । जाली तैसी ख्याती वोणव्याची ॥2॥ ओवािळलें तिनें करूनि आरती । पुसे दसवंती गोपाळांसि ॥3॥ पुसे पडताळुनी मागुती मागुती । गोपाळ सांगती कवतुक ॥4॥ कवतुका कानीं आइकतां त्यांचे । बोलतां ये वाचे वीट नये ॥5॥ नयन गुंतले श्रीमुख पाहतां । न साहे लवतां आड पातें ॥6॥ तेव्हां कवतुक कळों आलें कांहीं । हळुहळु दोहीं मायबापां ॥7॥ हळुहळु त्यांचें पुण्य जालें वाड । वारलें हें जाड तिमिराचें ॥8॥ तिमिर हें तेथें राहों शके कैसें । जालियां प्रकाशें गोविंदाच्या ॥9॥ दावी तुका ह्मणे देव ज्या आपणा । पालटे तें क्षणामाजी एका ॥10॥

Tuka 4515

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.