Tukaram Abhangs (Gatha)
तुकाराम गाथा
मूल श्लोकः
भHीसाटीं केली यशोदेसी आळी । थिंकोनिया चोळी डोळे देव ॥1॥ देव गिळुनियां धरिलें मोहन । माय ह्मणे कोण येथें दुजें ॥2॥ दुजें येथें कोणी नाहीं कृष्णाविण । निरुते जाणोन पुसे देवा ॥3॥ देवापाशीं पुसे देव काय जाला । हांसें आलें बोला याचें हरि ॥4॥ यांचे मी जवळी देव तो नेणती । लटिकें मानिती साच खरें ॥5॥ लटिकें तें साच साच तें लटिके । नेणती लोभिकें आशाबद्ध ॥6॥ सांग ह्मणे माय येरु वासी तोंड । तंव तें ब्रह्मांड देखे माजी ॥7॥ माजी जया चंद्र सूर्य तारांगणें । तो भHांकारणें बाळलीला ॥8॥ लीळा कोण जाणे याचें महिमान । जगाचें जीवन देवादिदेव ॥9॥ देवें कवतुक दाखविलें तयां । लागतील पायां मायबापें ॥10॥ मायबाप ह्मणे हा चि देव खरा । आणीक पसारा लटिका तो ॥11॥ तो हि त्यांचा देव दिला नारायणें । माझें हें करणें तो हि मी च ॥12॥ मीं च ह्मणउनि जें जें जेथें ध्याती । तेथें मी श्रीपति भोगिता तें ॥13॥ तें मज वेगळें मी तया निराळा । नाहीं या सकळा ब्रह्मांडांत ॥14॥ ततभावना तैसें भविष्य तयाचें । फळ देता साचें मी च एक ॥15॥ मी च एक खरा बोलें नारायण । दाविलें निर्वाण निजदासां ॥16॥ निजदासां खूण दाविली निरुती । तुका ह्मणे भूतीं नारायण ॥17॥
Tuka 4510
Audio
Translations & commentaries(0)
No translations available for this verse yet.