Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

तयांसवें करी काला दहींभात । सिदो†या अनंत मेळवुनी ॥1॥ मेळवुनी अवघियांचे एके ठायीं । मागें पुढें कांहीं उरों नेदी ॥2॥ नेदी चोरी करूं जाणे अंतरींचें । आपलें हीं साचें द्यावें तेथें ॥3॥ द्यावा दहींभात आपले प्रकार । तयांचा वेव्हार सांडवावा ॥4॥ वांटी सकळांसि हातें आपुलिया । जैसें मागे तया तैसें द्यावें ॥5॥ द्यावें सांभाळुनी सम तुकभावें । आपण हि खावें त्यांचें तुक ॥6॥ तुक सकळांचे गोविंदाचे हातीं । कोण कोणे गति भला बुरा ॥7॥ राखे त्यासि तैसें आपलाल्या भावें । विचारुनि द्यावें जैसें तैसें ॥8॥ तैसें सुख नाहीं वैकुंठींच्या लोकां । तें दिलें भाविकां गोपाळांसि ॥9॥ गोपाळांचे मुखीं देउनी कवळ । घांस माखे लाळ खाय त्यांची ॥10॥ त्यांचिये मुखींचे काढूनियां घांस। झोंबतां हातांस खाय बळें ॥11॥ बळें जयाचिया ठेंगणें सकळ । तयातें गोपाळ पाडितील ॥12॥ पाठी उचलूनि वाहातील खांदीं । नाचतील मांदीं मेळवुनी ॥13॥ मांदीं मेळवुनी धणी दिली आह्मां। तुका ह्मणे जमा केल्या गाइऩ ॥14॥

Tuka 4506

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.