Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

गोविंद भ्रतार गोविंद मुळहारी । नामें भेद परि एक चि तो ॥1॥ एकाचीं च नामें ठेवियेलीं दोनी । किल्पतील मनीं यावें जावें ॥2॥ जावें यावें तिहीं घरऴिचया घरीं । तेथिची सिदोरी तेथें न्यावी ॥3॥ विचारितां दिसे येणें जाणें खोटें । दाविती गोमटें लोका ऐसें ॥4॥ लोक करूनियां साच वर्तताती । तैशा त्या खेळती लटिक्याची ॥5॥ लटिकीं करिती मंगळदायकें । लटिकीं च एकें एकां व्याही ॥6॥ व्याही भाइऩ हरि सोयरा जावायी । अवघियांच्या ठायीं केला एक ॥7॥ एकासि च पावे जें कांहीं करिती । उपचार संपित्त नाना भोग ॥8॥ भोग देती सर्व एका नारायणा । लटिक्या भावना व्याही भाइऩ ॥9॥ लटिका च त्यांणीं केला संवसार । जाणती साचार वेगळा त्या ॥10॥ त्यांणीं मृित्तकेचें करूनि अवघें । खेळतील दोघें पुरुषनारी ॥11॥ पुरुषनारी त्यांणीं ठेवियेलीं नावें । कवतुकभावें विचरती ॥12॥ विचरती जैसे साच भावें लोक । तैसें नाहीं सुख खेळतीया ॥13॥ यांणीं जाणितलें आपआपणया । लटिकें हें वांयां खेळतों तें ॥14॥ खेळतों ते आह्मीं नव्हों नारीनर । ह्मणोनि विकार नाहीं तयां ॥15॥ तया ठावें आहे आह्मी अवघीं एक । ह्मणोनि निःशंक खेळतील ॥16॥ तयां ठावें नाहीं हरिचिया गुणें । आह्मी कोणकोणें काय खेळों ॥17॥ काय खातों आह्मी कासया सांगातें । कैसें हें लागतें नेणों मुखी॥18॥ मुखीं चवी नाहीं वरी अंगीं लाज । वरणा याती काज न धरिती॥19॥ धरितील कांहीं संकोच त्या मना । हांसतां या जना नाइकती॥20॥ नाइकती बोल आणिकांचे कानीं । हरि चित्तीं मनीं बैसलासे ॥21॥ बैसलासे हरि जयांचिये चित्तीं । तयां नावडती मायबापें ॥22॥ मायबापें त्यांचीं नेती पाचारुनि । बळें परि मनीं हरि वसे ॥23॥ वसतील बाळा आपलाले घरीं । ध्यान त्या अंतरीं गोविंदाचें ॥24॥ गोविंदाचें ध्यान निजलिया जाग्या । आणीक वाउग्या न बोलती॥25॥ न बोलती निजलिया हरिविण । जागृति सपन एक जालें ॥26॥ एकविध सुख घेती नित्य बाळा । भ्रमर परिमळालागीं तैशा ॥27॥ तैसा त्यांचा भाव घेतला त्यांपरी । तुका ह्मणे हरि बाळलीला॥28॥

Tuka 4500

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.