Tukaram Abhangs (Gatha)
तुकाराम गाथा
मूल श्लोकः
तुका ह्मणे पुन्हा न येती मागुत्या । कृष्णासीं खेळतां दिवस गमे ॥1॥ दिवस राती कांहीं नाठवे तयांसी । पाहातां मुखासी कृष्णाचिया ॥2॥ याच्या मुखें नये डोळयासी वीट । राहिले हे नीट ताटस्थ चि ॥3॥ ताटस्थ राहिलें सकळ शरीर । इंिद्रयें व्यापार विसरलीं ॥4॥ विसरल्या तान भुक घर दार । नाहीं हा विचार आहों कोठें ॥5॥ कोठें असों कोण जाला वेळ काळ । नाठवे सकळ विसरल्या ॥6॥ विसरल्या आह्मीं कोणीये जातीच्या। वर्णा ही चहूंच्या एक जाल्या ॥7॥ एक जाल्या तेव्हां कृष्णाचिया सुखें । निःशंकें भातुकें खेळतील ॥8॥ खेळता भातुकें कृष्णाच्या सहित । नाहीं आशंकित चित्त त्यांचें ॥9॥ चित्तीं तो गोविंद लटिकें दळण । करिती हें जन करी तैसें ॥10॥ जन करी तैसा खेळतील खेळ । अवघा गोपाळ करूनियां ॥11॥ करिती आपला आवघा गोविंद । जना साच फंद लटिका त्या ॥12॥ त्याणीं केला हरि सासुरें माहेर । बंधु हे कुमर दीर भावें ॥13॥ भावना राहिली एकाचिये ठायीं । तुका ह्मणे पायीं गोविंदाचे ॥14॥
Tuka 4499
Audio
Translations & commentaries(0)
No translations available for this verse yet.