Tukaram Abhangs (Gatha)
तुकाराम गाथा
मूल श्लोकः
कृष्ण हा परिचारी कृष्ण हा वेव्हारी । कृष्ण घ्या वो नारी आणिकी ह्मणे ॥1॥ ह्मणे कृष्णाविण कैसें तुह्मां गमे । विळ हा करमे वांयांविण ॥2॥ वांयांविण तुह्मीं पिटीत्या चाकटी । घ्या गे जगजेठी क्षणभरी ॥3॥ क्षणभरी याच्या सुखाचा सोहळा । पहा एकवेळा घेऊनियां ॥4॥ याचें सुख तुह्मां कळलियावरि । मग दारोदारीं न फिराल ॥5॥ लटिकें हें तुह्मां वाटेल खेळणें । एका कृष्णाविणें आवघें चि ॥6॥ अवघ्यांचा तुह्मीं टाकाल सांगात । घेऊनि अनंत जाल राना ॥7॥ नावडे तुह्मांस आणीक बोलिलें । मग हें लागलें हरिध्यान ॥8॥ न करा हा मग या जीवा वेगळा । टोंकवाल बाळा आणिका ही ॥9॥ आणिका ही तुह्मा येती काकुलती। जवळी इिच्छती क्षण बैसों ॥10॥ बैसों चला पाहों गोपाळाचें मुख। एकी एक सुख सांगतील ॥11॥ सांगे जंव ऐसी मात दसवंती । तंव धरिती चित्तीं बाळा ॥12॥ बाळा एकी घरा घेउनियां जाती । नाहीं त्या परती तुका ह्मणे ॥13॥
Tuka 4498
Audio
Translations & commentaries(0)
No translations available for this verse yet.