Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

जगाचा हा बाप दाखविलें माये । माती खातां जाये मारावया ॥1॥ मारावया तिणें उगारिली काठी । भुवनें त्या पोटीं चौदा देखे ॥2॥ देखे भयानक झांकियेले डोळे । मागुता तो खेळे तयेपुढे ॥3॥ पुढें रिघोनियां घाली गळां कव । कळों नेदी माव मायावंता ॥4॥ मायावंत विश्वरूप काय जाणे । माझें माझें ह्मणे बाळ देवा ॥5॥ बाळपणीं रीठा रगडिला दाढे । मारियेले गाढे कागबग ॥6॥ गळां बांधऊनि उखळासी दावें । उन्मळी त्या भावें विमळार्जुन ॥7॥ न कळे जुनाट जगाचा जीवन । घातलें मोहन गौिळयांसी ॥8॥ सिंकीं उतरूनि खाय नवनीत । न कळे बहुत होय तरी ॥9॥ तरीं दुधडेरे भरले रांजण । खाय ते भरून दावी दुणी ॥10॥ दुणी जालें त्याचा मानिती संतोष दुभत्याची आस धरूनियां ॥11॥ आशाबद्धा देव असोनि जवळी । नेणती ते काळीं स्वार्थामुळें ॥12॥ मुळें याच देव न कळे तयांसी । चित्त आशापाशीं गोवियेलें ॥13॥ लेंकरूं आमचें ह्मणे दसवंती । नंदाचिये चित्तीं तो चि भाव ॥14॥ भाव जाणावया चरित्र दाखवी। घुसिळतां रवी डेरियांत ॥15॥ डेरियांत लोणी खादलें रिघोनि । पाहे तों जननी हातीं लागे ॥16॥ हातीं धरूनियां काढिला बाहेरी। देखोनियां करी चोज त्यासी ॥17॥ सिकवी विचार नेणे त्याची गती । होता कोणे रीती डेरियांत ॥18॥ यांसी पुत्रलोभें न कळे हा भाव । कळों नेदी माव देव त्यांसी ॥19॥ त्यांसी मायामोहजाळ घाली फांस । देर आपणास कळों नेदी ॥20॥ नेदी राहों भाव लोभिकांचे चित्तीं । जाणतां चि होती अंधळीं तीं ॥21॥ अंधळीं तीं तुका ह्मणे संवसारीं । जिहीं नाहीं हरि ओळखिला ॥22॥

Tuka 4495

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.