Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

चाड अनन्याची धरी नारायण । आपणासमान करी रंका ॥1॥ रंक होती राजे यमाचिये घरीं । आचरणें बरी नाहीं ह्मणवोनि ॥2॥ नसंपडे इंद्रचंद्रब्रह्मादिकां । अभिमानें एका तिळमात्रें॥3॥ तिळमात्र जरी होय अभिमान । मेरु तो समान भार देवा ॥4॥ भार पृथिवीचा वाहिला सकळ । जड होती खळ दुष्ट लोक ॥5॥ दुष्ट अभH जे निष्ठ मानसीं । केली हे तयांसी यमपुरी ॥6॥ यमदूत त्यांसी करिती यातना । नाहीं नारायणा भजिजेलें ॥7॥ जे नाहीं भजले एका भावें हरी । तयां दंड करी यमधर्म ॥8॥ यमधर्म ह्मणे तयां दोषियांसी । कां रे केशवासी चुकलेती ॥9॥ चुकलेती कथा पुराणश्रवण । होते तुह्मां कान डोळे मुख ॥10॥ कान डोळे मुख संतांची संगति । न धरा च चित्तीं सांगितलें ॥11॥ सांगितलें संतीं तुह्मां उगवूनि । गर्भाद येऊनि यमदंड ॥12॥ दंडूं आह्मीं रागें ह्मणे यमधर्म । देवा होय श्रम दुर्जनाचा ॥13॥ दुर्जनाचा याणें करूनि संहार । पूर्णअवतार रामकृष्ण ॥14॥ रामकृष्णनामें रंगले जे नर । तुका ह्मणे घर वैकुंठी त्यां ॥15॥

Tuka 4490

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.