Tukaram Abhangs (Gatha)
तुकाराम गाथा
मूल श्लोकः
यांच्या पूर्वपुण्या कोण लेखा करी । जिंहीं तो मुरारी खेळविला ॥1॥ खेळविला जिंहीं अंतर्बाहएसुखें । मेळवूनि मुखें चुंबन दिलें ॥2॥ दिलें त्यांसी सुख अंतरीचें देवें । जिंहीं एका भावें जाणितला ॥3॥ जाणितला तिहीं कामातुर नारी । कृष्णभोगावरी चित्त ज्यांचें ॥4॥ ज्यांचें कृष्णीं तन मन जालें रत । गृह पति सुत विसरल्या ॥5॥ विष तयां जालें धन मान जन । वसविती वन एकांतीं त्या ॥6॥ एकांतीं त्या जाती हरीसी घेउनि । भोगइच्छाधणी फेडावया ॥7॥ वयाच्या संपन्ना तैसा त्यांकारणें । अंतरींचा देणें इच्छाभोग ॥8॥ भोग त्याग नाहीं दोन्ही जयापासीं । तुका ह्मणे जैसी स्पटिकशिळा ॥9॥
Tuka 4487
Audio
Translations & commentaries(0)
No translations available for this verse yet.