Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

देवा आदिदेवा जगत्रया जीवा । परियेसीं केशवा विनंती माझी ॥1॥ माझी वाणी तुझे वर्णी तुझे वर्णी गुण नाम । ऐसी देइप प्रेम कांहीं कळा ॥2॥ कळा तुजपाशीं आमचें जीवन । उचित करून देइप आह्मां ॥3॥ आह्मां शरणागतां तुझा चि आधार। तूं तंव सागर कृपासिंधु ॥4॥ सिंधु पायावाट होय तुझ्या नामें । जाळीं महाकर्में दुस्तरें तीं ॥5॥ तीं फळें उत्तमें तुझा निजध्यास । नाहीं गर्भवास सेविलिया ॥6॥ सेविंलिया राम कृष्ण नारायण । नाहीं त्या बंधन संसाराचें ॥7॥ संसार तें काय तृणवतमय । अिग्न त्यासी खाय क्षणमात्रें ॥8॥ क्षणमात्रें जाळी दोषांचिया रासी । निंद्य उत्तमासी वंद्य करी ॥9॥ करीं िब्रदें साच आपलीं आपण । पतितपावन दिनानाथ ॥10॥ नाथ अनाथाचा पति गोपिकांचा । पुरवी चित्तींचा मनोरथ ॥11॥ चित्तीं जें धरावें तुका ह्मणे दासीं । पुरविता होसी मनोरथ ॥12॥

Tuka 4484

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.