Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

विचार करिती बैसोनि गौळणी । ज्या कृष्णकामिनी कामातुरा ॥1॥ एकांत एकल्या एका च सुखाच्या । आवडती त्यांच्या गोष्टी त्यांला ॥2॥ तर्कवितकिर्णी दुराविल्या दुरी । मौन त्या परिचारी आरंभिलें ॥3॥ कुशळा कवित्या कथित्या लोभिका । त्या ही येथें नका आह्मांपाशीं ॥4॥ बोलक्या वाचाळा कृष्णरता नाहीं । यां चोरोनि तींहीं खेट केली ॥5॥ भेऊनियां जना एकी सवा जाल्या । वाती विझविल्या दाटोबळें ॥6॥ कृष्णसुख नाहीं कळलें मानसीं । निंदिती त्या त्यासी कृष्णरता ॥7॥ तो नये जवळी देखोनि कोल्हाळ । ह्मणउनि समेळ मेळविला ॥8॥ अंतरीं कोमळा बाहेरी निर्मळा । तल्लीन त्या बाळा कृष्णध्यानीं ॥9॥ हरिरूपीं दृिष्ट कानीं त्या च गोष्टी । आळंगिती कंठीं एका एकी ॥10॥ न साहे वियोग करिती रोदना । भ्रमिष्ट भावना देहाचिया ॥11॥ विसरल्या मागें गृह सुत पती । अवस्था याचिती गोविंदाची ॥12॥ अवस्था लागोनि निवळ चि ठेल्या । एका एकी जाल्या कृष्णरूपा॥13॥ कृष्णा ह्मणोनियां देती आलिंगन । विरहताप तेणें निवारेना ॥14॥ ताप कोण वारी गोविंदावांचूनि । साच तो नयनीं न देखतां ॥15॥ न देखतां त्यांचा प्राण रिघों पाहे । आजि कामास ये उसिर केला ॥16॥ रित्या Yाानगोष्टी तयां नावडती । आिंळगण प्रीती कृष्णाचिया ॥17॥ मागें कांहीं आह्मी चुकलों त्याची सेवा । असेल या देवा राग आला ॥18॥ आठविती मागें पापपुण्यदोष । परिहार एकीस एक देती ॥19॥ अनुतापें जाल्या संतप्त त्या बाळा । टाकुनि विव्हळा धरणी अंग ॥20॥ जाणोनि चरित्र जवळी च होता । आली त्या अनंता कृपा मग ॥21॥ होउनी प्रगट दाखविलें रूप । तापत्रय ताप निवविले ॥22॥ निवालेया देखोनि कृष्णाचें श्रीमुख । शोक मोह दुःख दुरावला॥23॥ साच भाव त्यांचा आणुनियां मना । आळंगितो राणा वैकुंठींचा॥24॥ हरिअंगसंगें हरिरूप जाल्या । बोलों विसरल्या तया सुखा ॥25॥ व्यभिचारभावें भोगिलें अनंता । वताौनि असतां घराचारी ॥26॥ सकळा चोरोनि हरि जयां चित्तीं । धन्य त्या नांदती तयामध्यें॥27॥ उणें पुरें त्यांचें पडों नेंदी कांहीं । राखे सर्वां ठायीं देव तयां ॥28॥ न कळे लाघव ब्रह्मादिकां भाव । भिHभावें देव केला तैसा ॥29॥ तुका ह्मणे त्यांचा धन्य व्यभिचार । साधिलें अपार निजसुख ॥30॥ बाळक्रीडा प्रारंभ अभंग - 100

Tuka 4483

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.