Tukaram Abhangs (Gatha)
तुकाराम गाथा
मूल श्लोकः
पांडुरंगा करूं प्रथम नमन । दुसरें चरणा संतांचिया॥1॥ याच्या कृपादानें कथेचा विस्तार । बाबाजीसद्गुदास तुका ॥2॥ काय माझी वाणी मानेल संतांसी । रंजवूं चित्तासी आपुलिया ॥3॥ या मनासी लागो हरिनामाचा छंद । आवडी गोविंद गावयासी ॥4॥ सीण जाला मज संवसारसंभ्रमें । सीतळ या नामें जाली काया॥5॥ या सुखा उपमा नाहीं द्यावयासी । आलें आकारासी निविऩकार ॥6॥ नित्य धांवे तेथें नामाचा गजर । घोष जयजयकार आइकतां ॥7॥ तांतडी ते काय हरिगुण गाय । आणीक उपाय दुःखमूळ ॥8॥ मूळ नरकाचें राज्यमदेंमाते । अंतरे बहुत देव दुरी ॥9॥ दुरी अंतरला नामनिंदकासी । जैसें गोंचिडासी क्षीर राहे ॥10॥ हे वाट गोमटी वैकुंठासी जातां । रामकृष्णकथा दिंडी ध्वजा ॥11॥ जाणतयांनीं सांगितलें करा । अंतरासी वारा आडूनियां ॥12॥ यांसी आहे ठावें परि अंध होती । विषयाची खंती वाटे जना ॥13॥ नाहीं त्या सुटलीं द्रव्य लोभ माया । भस्म दंड छाया तरुवराची ॥14॥ चित्त ज्याचें पुत्रपत्नीबंधूवरी । सुटल हा परि कैसें जाणा ॥15॥ जाणत नेणत करा हरिकथा । तराल सर्वथा भाक माझी ॥16॥ माझी मज असे घडली प्रचित । नसेल पतित ऐसा कोणी ॥17॥ कोणीं तरी कांहीं केलें आचरण । मज या कीर्तनेंविण नाहीं ॥18॥ नाहीं भय भHा तराया पोटाचें । देवासी तयाचें करणें लागे ॥19॥ लागे पाठोवाटी पाहे पायांकडे । पीतांबर खडे वाट सांडी ॥20॥ डिंकोनियां कां रे राहिले हे लोक । हें चि कवतुक वाटे मज ॥21॥ जयानें तारिले पाषाण सागरीं । तो ध्या रे अंतरीं स्वामी माझा॥22॥ माझिया जीवाची केली सोडवण । ऐसा नारायण कृपाळु हा ॥23॥ हा चि माझा नेम हा चि माझा धर्म । नित्य वाचे नाम विठोबाचें ॥24॥ चेतवला अिग्न तापत्रयज्वाळ । तो करी शितळ रामनाम ॥25॥ मना धीर करीं दृढ चित्तां धरीं । तारील श्रीहरि मायबाप ॥26॥ बाप हा कृपाळु भHा भाविकांसी । घरीं होय दासी कामारी त्या ॥27॥ त्याचा भार माथां चालवी आपुला। जिहीं त्या दिधला सर्व भाव ॥28॥ भावेंविण त्याची प्रािप्त । पुराणें बोलती ऐसी मात ॥29॥ मात त्याची जया आवडे जीवासी। तया गर्भवासीं नाहीं येणें ॥30॥ यावें गर्भवासीं तरी च विष्णुदासीं। उद्धार लोकांसी पूज्य होती ॥31॥ होती आवडत जीवाचे ताइत। त्यां घडी अच्युत न विसंभे ॥32॥ भेदाभेद नाहीं चिंता दुःख कांहीं । वैकुंठ त्या ठायीं सदा वसे ॥33॥ वसे तेथें देव सदा सर्वकाळ । करिती निर्मळ नामघोष ॥34॥ संपदा तयांची न सरे कल्पांतीं । मेळविला भHी देवलाभ ॥35॥ लाभ तयां जाला संसारा येऊनी । भगवंत ॠणी भHी केला ॥36॥ लागलेंसे पिसें काय मूढजनां । काय नारायणा विसरलीं ॥37॥ विसरलीं तयां थोर जाली हाणी । पचविल्या खाणी चौयासी ॥38॥ शिकविलें तरी नाहीं कोणा लाज । लागलीसे भाज धन गोड ॥39॥ गोड एक आहे अविट गोविंद । आणीक तो छंद नासिवंत ॥40॥ तळमळ त्याची कांहीं तरी करा । कां रे निदसुरा बुडावया ॥41॥ या जनासी भय यमाचें नाहीं । सांडियेलीं तिहीं एकराज्यें ॥42॥ जेणें अिग्नमाजी घातलासे पाव । नेणता तो राव जनक होता॥43॥ तान भूक जिहीं साहिले आघात । तया पाय हात काय नाहीं॥44॥ नाहीं ऐसा तिहीं केला संवसार । दुःखाचे डोंगर तोडावया ॥45॥ याच जन्में घडे देवाचें भजन । आणीक हें Yाान नाहीं कोठें ॥46॥ कोठें पुढें नाहीं घ्यावया विसांवा । फिरोनि या गांवा आल्याविण॥47॥ विनवितां दिवस बहुत लागती । ह्मणउनि चित्तीं देव धरा ॥48॥ धरा पाय तुह्मी संतांचे जीवासी । वियोग तयांसी देवा नाहीं ॥49॥ नाहीं चाड देवा आणीक सुखाची । आवडी नामाची त्याच्या तया॥50॥ त्याची च उिच्छष्ट बोलतों उत्तरें । सांगितलें खरें व्यासादिकीं ॥51॥ व्यासें सांगितलें भिH हे विचार । भवसिंधु पार तरावया ॥52॥ तरावया जना केलें भागवत । गोवळ गोपी भH माता पिता ॥53॥ तारुनियां खरे नेली एक्यासरें । निमित्तें उत्तरें रुसिया ॥54॥ यासी वर्म ठावें भHां तरावया । जननी बाळ माया राख तान्हें ॥55॥ तान्हेलें भुकेलें ह्मणे वेळोवेळां । न मगतां लळा जाणोनियां ॥56॥ जाणोनियां वर्म देठ लावियेला । द्रौपदीच्या बोलासवें धांवे ॥57॥ धांवे सर्वता धेनु जैसी वत्सा । भHालागीं तैसा नारायण ॥58॥ नारायण व्होवा हांव ज्याच्या जीवा । धन्य त्याच्या दैवा पार नाहीं ॥59॥ पार नाहीं सुखा तें दिलें तयासी । अखंड वाचेसी रामनाम ॥60॥ रामनाम दोनी उत्तम अक्षरें । भवानीशंकरें उपदेशिलीं ॥61॥ उपदेश करी विश्वनाथ कानीं । वाराणसी प्राणी मध्यें मरे ॥62॥ मरणाचे अंतीं राम ह्मणे जरी । न लगे यमपुरी जावें तया ॥63॥ तयासी उत्तम ठाव वैकुंठीं । वसे नाम चित्तीं सर्वकाळ ॥64॥ सर्वकाळ वसे वैष्णवांच्या घरीं । नसे क्षणभरी थिर कोठें ॥65॥ कोठें नका पाहों करा हरिकथा । तेथें अवचिता सांपडेल ॥66॥ सांपडे हा देव भाविकांचे हातीं । शाहाणे मरती तरी नाहीं ॥67॥ नाहीं भलें भHी केलियावांचूनि। अहंता पापिणी नागवण ॥68॥ नागवलों ह्मणे देव मी आपणा । लाभ दिला जना ठकलों तो ॥69॥ तो चि देव येर नव्हे ऐसें कांहीं। जनादऩन ठायीं चहूं खाणी ॥70॥ खाणी भरूनियां राहिलासे आंत । बोलावया मात ठाव नाहीं ॥71॥ ठाव नाहीं रिता कोणी देवाविण । ऐसी ते सज्जन संतवाणी ॥72॥ वाणी बोलूनियां गेलीं एक पुढें । तयासी वांकुडें जातां ठक ॥73॥ ठका नाहीं अर्थ ठाउका वेदांचा । होऊनि भेदाचा दास ठेला ॥74॥ दास ठेला पोट अर्थ दंभासाटीं । ह्मणउनि तुटी देवासवें ॥75॥ सवें देव द्विजातीही दुराविला । आणिकांचा आला कोण पाड ॥76॥ पाड करूनियां नागविलीं फार । पंडित वेव्हार खळवादी ॥77॥ वादका निंदका देवाचें दरुशन । नव्हे जाला पूर्ण षडकमाअ ॥78॥ षडकमाअ हीन रामनाम कंठीं । तयासवें भेटी सवें देवा ॥79॥ देवासी आवड भाविक जो भोळा । शुद्ध त्या चांडाळा करुनि मानी ॥80॥ मानियेल्या नाहीं विश्वास या बोला । नाम घेतां मला युिH थोडी॥81॥ युH थोडी मज दुर्बळाची वाचा । प्रताप नामाचा बोलावया ॥82॥ बोलतां पांगल्या श्रुति नेति नेति । खुंटलिया युिH पुढें त्यांच्या॥83॥ पुढें पार त्याचा न कळे चि जातां । पाउलें देखतां ब्रह्मादिकां॥84॥ काय भHीपिसें लागलें देवासी । इच्छा ज्याची जैसी तैसा होय॥85॥ होय हा सगुण निर्गुण आवडी । भिHिप्रय गोडी फेडावया ॥86॥ या बापासी बाळ बोले लाडें कोडें । करुनि वांकुडें मुख तैसें॥87॥ तैसें याचकाचें समाधान दाता । होय हा राखता सkवकाळीं ॥88॥ सkवकाळीं कामा न येती आयुधें । बळ हा संबंध सैन्यलोक॥89॥ सैन्यलोक तया दाखवी प्रताप । लोटला हा कोप कोपावरी ॥90॥ कोपा मरण नाहीं शांत होय त्यासी । प्रमाण भल्यासी सkवगुणीं॥91॥ सkवरजतमा आपण नासती । करितां हे भिH विठोबाची ॥92॥ चित्त रंगलिया चैतन्य चि होय । तेथें उणें काय निजसुखा ॥93॥ सुखाचा सागरु आहे विटेवरी । कृपादान करी तो चि एक ॥94॥ एक चित्त धरूं विठोबाचे पायीं । तेथें उणें कांहीं एक आह्मां ॥95॥ आह्मांसी विश्वास याचिया नामाचा । ह्मणउनि वाचा घोष करूं॥96॥ करूं हरिकथा सुखाची समाधि । आणिकाची बुद्धी दुष्ट नास ॥97॥ नासे संवसार लोकमोहो माया । शरण जा रे तया विठोबासी॥98॥ सिकविलें मज मूढा संतजनीं । दृढ या वचनीं राहिलोंसे ॥99॥ राहिलोंसे दृढ विठोबाचे पायीं । तुका ह्मणे कांहीं न लगे आंता॥100॥
Tuka 4481
Audio
Translations & commentaries(0)
No translations available for this verse yet.