Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

दारिद्रानें विप्र पीडिला अपार । तया पोटीं पोर एक असे ॥1॥ बाहेरी मिष्टान्न मिळे एके दिशीं । घेऊनी छंदासि त्या चि बैसे ॥ध्रु.॥ क्षुधाकाळीं रडे देखिलें तें मागे । कांहीं केल्या नेघे दुजें कांहीं ॥2॥ सहज कौतुकें बोले बापमाये । देवापाशीं आहे मागशी तें ॥3॥ तेव्हां तुजलागीं स्मरे नारायणा । जीवींच्या जीवना पांडुरंगा॥4॥ लागली हे क्षुधा जात असे प्राण । काय हें निर्वाण पाहातोसि ॥5॥ ब्रह्मांडनायक विश्वाचा पाळक । वरी तिन्ही लोक पोसितोसि ॥6॥ प्राण हा उत्कर्ष जाहला विव्हळ । तेव्हां तो कृपाळ धांव घाली ॥7॥ सांडूनि वैकुंठ धांव घाली तइप । आळंगिला बाहीं कृपावंतें ॥8॥ तुका ह्मणे दिला क्षीराचा सागर । राहे निरंतर तयापासीं ॥9॥

Tuka 4469

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.