Tukaram Abhangs (Gatha)
तुकाराम गाथा
मूल श्लोकः
तुह्मी साधु संत कैवल्यसागर । मोक्षाचे आगर तुह्मां घरीं ॥1॥ तेथें मतिमंद काय बोलों वाणी । अमृताचे धणी पाणी कां घ्या ॥ध्रु.॥ कोटी भानु तेजीं खद्योत बापुडें । तैसा तुह्मांपुढें काय बोलों ॥2॥ तुह्मी अवघे चिंतामणि कल्पतरूचीं वनें । त्यापुढें धांवणें मषकांनीं ॥3॥ वाराणशीक्षेत्र गंगा वाहे कोड । का तेथें पाड कोकणाचे ॥4॥ पल्लवाचा वारा हिमकरीं काय । गगनावरी छाय कोण करी ॥5॥ समुद्राची तृषा हरी ऐसा कोण । जगाची जी तान्ह निववितो ॥6॥ मेरूचा पाठार अवघी ते िक्षति । मषकाचे हातीं मुिष्ट फावे ॥7॥ सिंहापुढें काय जंबूक आरोळी । मोतियांचे वोळी कांच काय ॥8॥ कापुरासि काय लावूनि उटावें । काय ओवाळावें दीपकासि ॥9॥ तैशी तुह्मी निरे Yाानाचे भरींव । तेथें म्यां बोलावें पाड काय ॥10॥ कृपानिधि तुह्मीं बोलविलें बोला । सुखें न्याय केला तुमचा मीं ॥11॥ अYाान मी वेडें ह्मणवितों बाळ । माझा प्रतिपाळ करणें तुह्मां ॥12॥ बोबडें बोलणें न धरावा कोप । क्षमा करा बाप कृपासिंधु ॥13॥ तुका ह्मणे तुह्मी संत बापमाय । भयें धरिले पाय कृपानिधि ॥14॥
Tuka 4457
Audio
Translations & commentaries(0)
No translations available for this verse yet.