Tukaram Abhangs (Gatha)
तुकाराम गाथा
मूल श्लोकः
मिथ्या आहे सर्व अवघें हें मायिक । न कळे विवेक मज कांहीं ॥1॥ सर्व बाजागिरी वाटती ही खरी । पहातां येथें उरी कांहीं नाहीं ॥ध्रु.॥ आतां मज दुःख वाटतें अंतरीं । उपाय झडकरी सांग कांहीं ॥2॥ पुढें कोण गति न कळे सर्वथा । तुझे पायीं माथा ठेवियेला ॥3॥ करणें तें करीं सुखें आतां हरी । तुज म्यां निर्धारीं धरियेलें ॥4॥ स्वहित तें काय न कळे सर्वथा । तारीं तूं अनंता तुका ह्मणे ॥5॥
Tuka 4431
Audio
Translations & commentaries(0)
No translations available for this verse yet.