Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

पाया जाला नारू । तेथें बांधला कापूरु । तेथें बिबव्याचें काम । अधमासि तों अधम ॥1॥ रुसला गुलाम । धणी करीतो सलाम । तेथें चाकराचें काम । अधमासि तों अधम ॥ध्रु.॥ रुसली घरची दासी । धणी समजावी तियेसि । तेथें बटकीचें काम। अधमासि तों अधम ॥2॥ देव्हा†यावरि विंचू आला । देवपूजा नावडे त्याला । तेथें पैजारेचें काम । अधमासि तों अधम ॥3॥ तुका ह्मणे जाती । जातीसाटीं खाती माती ॥4॥

Tuka 4355

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.