Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

पहिली माझी ओवी ओवीन जगत्र । गाइऩन पवित्र पांडुरंग ॥1॥ दुसरी माझी ओवी दुजें नाहीं कोठें । जनीं वनीं भेटे पांडुरंग ॥ध्रु.॥ तिसरी माझी ओवी तिळा नाहीं ठाव । अवघा चि देव जनीं वनीं ॥2॥ चवथी माझी ओवी वैरिलें दळण । गाइऩन निधान पांडुरंग ॥3॥ पांचवी माझी ओवी ते माझिया माहेरा । गाइऩन निरंतरा पांडुरंगा ॥4॥ साहावी माझी ओवी साहा ही आटले। गुरूमूर्त्त भेटले पांडुरंग ॥5॥ सातवी माझी ओवी आठवे वेळोवेळां। बैसलासे डोळां पांडुरंग ॥6॥ आठवी माझी ओवी आठावीस योग। उभा चंद्रभागे पांडुरंग ॥7॥ नववी माझी ओवी सरलें दळण। चुकलें मरण संसारीचें ॥8॥ दाहावी माझी ओवी दाहा अवतारा । न यावें संसारा तुका ह्मणे ॥9॥

Tuka 4334

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.