Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

जरी तुझा मज नसता आधार । कैसा हा संसार दु†हावला ॥1॥ ऐसा बळी कोण होइल पुरता । जो हे वारी चिंता आशापाश ॥ध्रु.॥ मायामोहफांसा लोकलाजबेडी । तुजवीण तोडी कोण एक ॥2॥ हें तों मज कळों आलें अनुभवें । बरें माझ्या जीवें पांडुरंगा ॥3॥ तुका ह्मणे यास तूं चि माझा गोही । पुरी भाव नाहीं जना लोका ॥4॥

Tuka 4268

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.