Tukaram Abhangs (Gatha)
तुकाराम गाथा
मूल श्लोकः
देश वेष नव्हे माझा । सहज फिरत आलों । करूं सत्ता कवणावरी । कोठें स्थिर राहिलों । पाय डोळे म्हणतां माझे । तींहीं कैसा मोकलिलों । परदेशीं नाहीं कोणी । अंध पांगुळ जालों ॥१॥ आतां माझी करीं चिंता । दान देई भगवंता । पाठीं पोटीं नाहीं कोणी । निरवीं सज्जन संता ॥ध्रु.॥ चालतां वाट पुढें । भय वाटतें चित्तीं । बहुत जन गेलीं नाहीं आलीं मागुतीं । न देखें काय जालें। कान तरी ऐकती । बैसलों संधिभागीं । तुज धरूनि चित्तीं ॥२॥ भाकितों करुणा गा । जैसा सांडिला ठाव । न भरें पोट कधीं नाहीं निश्चळ पाव । हिंडतां भागलों गा । लक्ष चौर्यां शी गांव । धरूनि राहिलों गा । हा चि वसता ठाव ॥३॥ भरवसा काय आतां । कोण आणि अवचिता । तैसी च जाली कीर्ति । तया मज बहुतां । म्हणउनि मारीं हाका । सोयी पावें पुण्यवंता । लागली भूक थोरी । तूं चि कृपाळू दाता ॥४॥ संचित सांडवलें । कांहीं होतें जवळीं । वित्त गोत पुत माया । तुटली हे लागावळी । निष्काम जालों देवा । होतें माझे कपाळीं । तुका म्हणे तूं चि आतां । माझा सर्वस्वें बळी ॥५॥
Tuka 424
Audio
Translations & commentaries(0)
No translations available for this verse yet.