Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

भ्रतारेंसी भार्या बोले गुज गोष्टी । मज ऐसी कष्टी नाहीं दुजी ॥1॥ अखंड तुमचें धंद्यावरी मन । माझें तों हेळण करिती सर्व ॥ध्रु.॥ जोडितसां तुह्मी खाती हेरेंचोरें । माझीं तंव पोरें हळहळीती ॥2॥ तुमची व्याली माझे डाइप हो पेटली । सदा दुष्ट बोली सोसवेना ॥3॥ दुष्टव्रुति नंदुली सदा द्वेष करी । नांदों मी संसारीं कोण्या सुखें ॥4॥ भावा दीर कांहीं धड हा न बोले । नांदों कोणां खालें कैसी आतां ॥5॥ माझ्या अंगसंगें तुह्मांसी विश्रांति । मग धडगति नाहीं तुमची ॥6॥ ठाकतें उमकतें जीव मुठी धरूनि। परि तुह्मी अजूनि न धरा लाज ॥7॥ वेगळे निघतां संसार करीन । नाहीं तरी प्राण देतें आतां ॥8॥ तुका ह्मणे जाला कामाचा अंकित। सांगे मनोगत तैसा वर्ते ॥9॥

Tuka 4223

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.