Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

मोलाचें आयुष्य वेचुनियां जाय । पूर्वपुण्यें होय लाभ याचा ॥1॥ अनंतजन्मींचे शेवट पाहतां । नर देह हातां आला तुझ्या ॥ध्रु.॥ कराल ते जोडी येइऩल कार्यासी । ध्यावें विठ्ठलासी सुखालागीं ॥2॥ सांचलिया धन होइऩल ठेवणें । तैसा नारायण जोडी करा ॥3॥ करा हरिभHी परलोकीं ये कामा । सोडवील यमापासोनियां ॥4॥ तुका ह्मणे करा आयुष्याचें मोल । नका वेचूं बोल नामेंविण ॥5॥ वर्ग:गाथा वर्ग:संत तुकाराम साहित्य वर्ग:तपासणी करायचे साहित्य‎

Tuka 3900

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.