Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

नामधारकासी नाहीं वर्णावर्ण । लोखंड प्रमाण नाना जात ॥1॥ शस्त्र अथवा गोळे भलता प्रकार । परिसीं संस्कार सकळ ही हेम ॥ध्रु.॥ प्रजन्य वर्षतां जीवना वाहावट । तें समसकट गंगे मिळे ॥2॥ सर्व तें हें जाय गंगा चि होऊन । तैसा वर्णावर्ण नाहीं नामीं ॥3॥ महांपुरीं जैसें जातसे उदक । मध्यें तें तारक नाव जैसी ॥4॥ तये नावेसंगें ब्राह्मण तरती । केवीं ते बुडती अनामिक॥5॥ नाना काष्ठजात पडतां हुताशनीं । ते जात होउनी एकरूप ॥6॥ तेथें निवडेना घुरे कीं चंदन । तैसा वर्णावर्ण नामीं नाहीं ॥7॥ पूर्वानुवोळख तें चि पैं मरण । जरि पावे जीवन नामामृत ॥8॥ नामामृतें जालें मुळीचें स्मरण । सहज साधन तुका ह्मणे ॥9॥ 3915 काय वांचोनियां जालों भूमिभार । तुझ्या पायीं थार नाहीं तरि ॥1॥ जातां भलें काय डोिळयांचें काम । जरि पुरुषोत्तम न देखती ॥ध्रु.॥ काय मुख बिळ श्वापदाचे धांव । नित्य तुझें नांव नुच्चारितां ॥2॥ तुका ह्मणे पैं या पांडुरंगाविण । न वचे चि क्षण जीव भला ॥3॥

Tuka 3814

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.