Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

भले लोक नाहीं सांडीत ओळखी । हे तों झाली देखी दुस†याची ॥1॥ असो आतां यासी काय चाले बळ । आपुलें कपाळ वोडवलें ॥ध्रु.॥ समर्थासी काय कोणें हें ह्मणावें । आपुलिया जावें भोगावरि ॥2॥ तुका ह्मणे तुह्मां बोल नाहीं देवा । नाहीं केली सेवा मनोभावें ॥3॥

Tuka 3802

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.