Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

न लगे मरावें । ऐसा ठाव दिला देवें ॥1॥ माझ्या उपकारासाटीं । वागविला ह्मुण कंठीं ॥ध्रु.॥ घरीं दिला ठाव । अवघा सकळ ही वाव ॥2॥ तुका ह्मणे एके ठायीं । कोठें माझें तुझें नाहीं ॥3॥ 3366. नाहीं लाग माग । न देखेंसें केलें जग ॥1॥ आतां बैसोनियां खावें । दिलें आइतें या देवें ॥ध्रु.॥ निवारिलें भय । नाहीं दुस†याची सोय ॥2॥ तुका ह्मणे कांहीं । बोलायाचें काम नाहीं॥3॥

Tuka 3365

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.