Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

मोटळें हाटीं सोडिल्या गांठी । विक†या घातलें केण। ज्याचे भाग त्यासी देऊनि वारिलें । सारूनि लिगाड दान । खरें माप हातीं घेऊनि बैसलों । मानिती ते चौघे जन । खरें वित्त तेथें आले चोजवीत । गि†हाइक संतजन ॥1॥ झाडिला पालव केला हाट वेच । जाली सकाळीं च अराणूक । याल तरि तुह्मी करा लगबग । आमचे ते कोणी लोक ॥ध्रु.॥ एक ते उत्तम मध्यम कनिष्ठ । वित्ताचे प्रकार तीन । बहुतां जनाचे बहुत प्रकार । वेगळाले वाण । लाभ हाणि कोणा मुदल जालें । कोणासी पडिलें खाण । अर्धमर्ध कोणी गुंतोनि राहिले । थोडे तैसे बहु जन ॥2॥ एके सांते आले एक गांवीहून । येकामे चि नव्हे जाणें । येतां जातां रुजू नाहीं दिवाणा । काळतोंडीं एकें तेणें । लाग भाग एकी एकानीं गोविलें । मागील पुढिलां ॠणें । तुका ह्मणे आतां पाहूं नये वास। साधावें आपुलें पेणें ॥3॥

Tuka 3279

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.