Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

कोणापाशीं आतां सांगों मी बोभाट । कधीं खटखट सरेल हे ॥1॥ कोणां आराणूक होइऩल कोणे काळीं । आपुलालीं जाळीं उगवूनि ॥ध्रु.॥ माझा येणें दुःखें फुटतसे प्राण । न कळतां जन सुखी असे ॥2॥ भोगा आधीं मनें मानिलासे त्रास । पाहें लपायास ठाव कोठें ॥3॥ तुका ह्मणे देतों देवाचें गा†हाणें । माझें रिण येणें सोसियेलें ॥4॥

Tuka 2651

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.