Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

प्रसिद्ध हा असे जगा । अवघ्या रंगारंगाचा ॥1॥ तरी वाटा न वजे कोणी । नारायणीं घरबुडी ॥ध्रु.॥ बहुतां ऐसें केलें मागें । लाग लागें लागेना ॥2॥ हो कां नर अथवा नारी । लाहान थोरीं आदर ॥3॥ जालें वेगळें लोकीं पुरे । मग नुरे समूळ ॥4॥ कळेना तो आहे कैसा । कोणी दिशा बहु थोडा ॥5॥ तुका ह्मणे दुस†या भावें । छायें नावें न देखवे ॥6॥

Tuka 2555

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.