Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

ऐका संतजन उत्तरें माझे बोबडे बोल । करीं लाड तुह्मांपुढें हो कोणी झणी कोपाल ॥1॥ उपाय साधन आइका कोण गति अवगति । दृढ बैसोनि सादर तुह्मी धरावें चित्तीं ॥ध्रु.॥ धर्म तयासी घडे रे ज्याचे स्वाधीन भाज । कर्म तयासी जोडे रे भीत नाहीं लाज ॥2॥ पुण्य तें जाणां रे भाइनो परउपकाराचें । परपीडा परनिंदा रे खरें पाप तयाचें ॥3॥ लाभ तयासी जाला रे मुखीं देव उच्चारी । प्रपंचापाठी गुंतला हाणी तयासी च थोरी ॥4॥ सुख तें जाणा रे भाइनो संतसमागम । दुःख तें जाणारे भाइनो शम तेथे विशम ॥5॥ साधन तयासी साधे रे ज्याची स्वाधीन बुिद्ध । पराधीनासी आहे घात रे थोर जाण संबंधी ॥6॥ मान पावे तो आगळा मुख्य इंिद्रयें राखे । अपमानी तो अधररसस्वाद चाखे॥6॥ जाणता तयासी बोलिजे जाणे समाधान । नेणता तयासी बोलिजे वाद करी भूषण ॥8॥ भला तो चि एक जाणा रे गयावर्जन करी । बुरा धन नष्ट मेळवी परद्वार जो करी ॥9॥ आचारी अन्न काढी रे गाइऩ अतितभाग । अनाचारी करी भोजन ग्वाही नसतां संग ॥10॥ स्वहित तेणें चि केलें रे भूतीं देखिला देव । अनहित तयाचें जालें रे आणी अहंभाव ॥11॥ धन्य जन्मा ते चि आले रे एक हरिचे दास । धिग ते विषयीं गुंतले केला आयुष्या नास ॥12॥ जोहोरि तो चि एक जाणा रे जाणे सिद्धलक्षणें । वेडसरु तो भुले रे वरदळभूषणें ॥13॥ बिळयाढा तो चि जाणा रे भिH दृढ शरीरीं। गांढएा तयासी बोलिजे एक भाव न धरी ॥14॥ खोल तो वचन गुरूचें जो गिळूनि बैसे । उथळ धीर नाहीं अंगीं रे ह्मणे होइऩल कैसें॥15॥ उदार तो जीवभाव रे ठेवी देवाचे पायीं । कृपण तयासी बोलिजे पडे उपाधिडाइप ॥16॥ चांगलेंपण तें चि रे ज्याचें अंतर शुद्ध । वोंगळ मिळन अंतरीं वाणी वाहे दुगपध ॥17॥ गोड तें चि एक आहे रे सार विठ्ठलनाम । कडु तो संसार रे लक्षचौ†याशी जन्म ॥18॥ तुका ह्मणे मना घरी रे संतसंगतिसोइऩ । न लगे कांहीं करावें राहें विठ्ठलपायीं ॥19॥ ॥ येकाखडी ॥ 1॥

Tuka 2302

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.