Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

कथा हें भूषण जनामध्यें सार । तरले अपार बहुत येणें ॥1॥ नीचिये कुळींचा उंचा वंद्य होय । हरीचे जो गाय गुणवाद ॥ध्रु.॥ देव त्याची माथां वंदी पायधुळी । दीप झाला कुळीं वंशाचिये ॥2॥ त्याची निंदा करी त्याची कुष्ठ वाणी । मुख संवदणी रजकाची ॥3॥ तुका ह्मणे नाहीं चोरीचा व्यापार । विठ्ठलाचें सार नाम ध्यावें ॥4॥ वर्ग:गाथा वर्ग:संत तुकाराम साहित्य वर्ग:तपासणी करायचे साहित्य‎

Tuka 2100

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.