Tukaram Abhangs (Gatha)
तुकाराम गाथा
मूल श्लोकः
पंढरी चोहटा मांडियेला खेळ । वैष्णव मिळोनि सकळ रे । टाळ टिपरी मांदळे एक नाद रे । जाला बसवंत देवकीचा बाळ रे ॥१॥ चला तें कवतुक भाई रे । पाहों डोळां कामीं गुंतलेति काई रे । भाग्यवंत कोणी गेले सांगाति । ऐसें सुख त्रिभुवनीं नाहीं रे ॥ध्रु.॥ आनंदाचे वाद सुखाचे संवाद । एक एका दाखविती छंद रे । साही अठरा चारी घालुनियां घाई । नाचती फेरी टाळशुद्ध रे ॥२॥ भक्ताचीं भूषणें मुद्रा आभरणें । शोभती चंदनाच्या उट्या रे । सत्व सुंदर कास घालूनि कुसरी । गर्जती नाम बोभाटीं रे ॥३॥ हरि हर ब्रम्हा तीर्थासहित भीमा । देव कोटी तेहतीस रे । विस्मित होऊनि ठाकले सकळ जन । अमरावती केली ओस रे ॥४॥ वाणितील थोरी वैकुंठिचीं परी । न पवे पंढरीची सरी रे । तुकयाचा दास म्हणे नका आळस करूं । सांगतों नरनारींस रे ॥५॥ ॥७॥
Tuka 195
Audio
Translations & commentaries(0)
No translations available for this verse yet.